Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव शहरात १२५ अनधिकृत बॅनर काढले
    जळगाव

    जळगाव शहरात १२५ अनधिकृत बॅनर काढले

    saimat teamBy saimat teamOctober 3, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जळगाव शहरात १२५ अनधिकृत बॅनर काढले
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । महानगरपालिकेची परवानगी न घेता वाट्टेल तिथे मनमानीपणे बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध मनपा व पोलिस प्रशासनाने मोहीम उघडली आहे. शनिवारी शहरातील विविध भागातून १२५ अनधिकृत बॅनर हटवण्यात आले आहेत. रविवारी देखील मोहीम सुरू राहणार आहे. मात्र, सोमवारपासून विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सोबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हाेईल.

    उच्च न्यायालयाने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चमकोगिरी करणाऱ्यांकडून थेट महापालिकेसमोर मोठे बॅनर लावण्यात येते. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक, चौकात तसेच कॉर्नरला बॅनर लावून अपघातांना आमंत्रण देण्याचे प्रकार केले जातात. या विरुद्ध जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे व महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शनिवार व रविवारी महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत तसेच विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जळगाव शहरात विविध मार्गांवरील १२५ बॅनर काढण्यात आले आहेत. रविवारी देखील ही मोहीम सुरू राहणार आहे. सोमवारपासून मनपाची परवानगी न घेता बॅनर आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जाणार असल्याचे मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.