जळगाव शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, काँग्रेसचे नेते उतरले रस्त्यावर

0
38
जळगावात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक सविस्तर वाचा ???? https://saimatlive.com/?p=4419 ================================ आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ *8888448321 या क्रमांकावर पाठवू शकता ! साईमत लाईव्ह फेसबुक पेज - https://www.facebook.com/saimatlivenews युट्युब लिंक - https://bit.ly/2WMrgcd ई- मेल - saimatlive1@gmail.com साईमत वेबसाईट - https://saimatlive.com/ व्हाट्सअप ग्रुप - https://chat.whatsapp.com/Ckw2ADfvWoR8k7761YdFtJ

जळगाव प्रतिनिधी । आज देशव्यापी भारत बंद संप पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजारपेठेतून रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन आज सोमवार सकाळी 11 वाजता केले.

भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी भारत बंदचा संप पुकारण्यात आला आहे. देशातील जनतेचा आक्रोश समाजासमोर यावा, यासाठी भारत बंदची हाक सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिली आहे. कायद्याची तोडमोड करून देशात हुकुमशाही आणण्याचा कट मोदी सरकारने केला आहे. याला तोंड फोडणे आवश्यक असल्याने भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत अकरा महिन्यांपासून शेतकरी काळे कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे, इंधन दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी भारत बंद आंदोलन करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या काळात उभारण्यात आलेल्या सत्ता संपत्ती मोदी सरकारला उभारता आले नाही. उलट ते विक्री धोरण अवलंबले आहे. आरोप काँग्रेसने केला होता. या धर्तीवर आज सोमवार २७ सप्टेंबर रोजी शहरातील फुले मार्केट परिसर, दाणाबाजार परिसर, जुने बस स्थानक परिसर, नेहरू पुतळा ते टॉवर चौकात दरम्यान असलेले दुकाने, गोलाणी मार्केट, न्यू बीजे मार्केट परिसरात काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील ,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, रवी योगेंद्र पाटील, महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जनरल सेक्रेटरी जमील शेख यांच्यासह आदी नेते रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे, दरम्यान आज पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला जळगाव शहरातील व्यापारी व दुकानदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here