जळगाव, प्रतिनिधी | शहरात आज जिव्हाळा हेल्थ केअर सेंटरचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन, यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आयएमए अध्यक्ष डॉ. सी.जी.चौधरी, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. जिव्हाळा नर्सिंग ब्युरोची सुरूवात २००६ साली घरी जाऊन रूग्णांना सेवा देणे या पध्दतीने झाली. २००८ मध्ये औरंगाबाद येथे जिव्हाळ्याच्या पहिल्या हेल्थ केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
ग्राहकांचा प्रतिसाद बघता औरंगाबाद नंतर अहमदनगर येथे २००८ साली आणि जळगावमध्ये २०१९ साली घरोघरी जाऊन रूग्णसेवा सुरू करण्यात आली, आणि आता जिव्हाळ्याचे प्रशस्त हेल्थ केअर सेंटरचा मान्यवरांच्या हस्ते प्लॉट नं.१९, मयुर सोसायटी, वाटीका आश्रम जवळ, पंडीत कॉर्नर मागे, धुळे रोड, येथे आज रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन हे हेल्थकेअर सेंटर उभारण्यात आल्याने संचलाकांचे अभिनंदन केले. याठिकाणी पेशंटला ठेवण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी जिव्हाळा नर्सिंग ब्युरो आणि हेल्थ केअर सेंटरला संपर्क करण्याचे आवाहन जिव्हाळ्याचे संचालक डॅनियल दास आणि छाया दास यांनी जळगावकरांना केलेले आहे.