जळगाव, प्रतिनिधी । शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
२५ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा २६ ऑक्टोबर रोजी होणार असून, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव शहर महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.