जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वनपाल वनरक्षक संघटनेची बैठक शनिवारी लांडोरखोरी येथे आयोजित करण्यात आली होती. यात नागपूर विभागांतर्गत जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी देविदास जाधव यांची निवड करण्यात आली.
वनपाल वनरक्षक संघटनेच्या जळगाव शाखेच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष अनिल साळुंखे तर सचिव संदीप पाटील यांची वर्णी लागली. माजी अध्यक्ष डी. एम. कोळी, जळगावचे वनपाल पी. जे. सोनवणे, जामनेरचे वनपाल सुनील पवार, पी. पी. शेजुळे, प्रेमराज सोनवणे, भारत पवार यांच्यासह जामनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर, वडोदा,जळगाव येथील वनरक्षक व वनपाल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वनपाल वनरक्षक संघटनेची बैठक लांडोरखोरी येथे शनिवारी झाली.