जळगाव महापालिकेची अवघ्या दाेन तासांत ३० लाखांची वसुली

0
44
जळगाव महापालिकेची अवघ्या दाेन तासांत ३० लाखांची वसुली

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने गाळेधारकांकडील थकबाकी वसुलीला पुन्हा सुरुवात केली अाहे. मंगळवारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात दुपारी दाेन तासात ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

तसेच जप्त केलेल्या गाळ्यांमधील साहित्याचा लिलाव करण्यासाठी साहित्याची यादी तयार करण्यात येत अाहे. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून थांबवलेली थकबाकीदारांविरुद्ध माेहीम पुन्हा सुरू केली अाहे. पालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्केट असलेल्या सेंट्रल फुले मार्केटमध्ये पालिकेच्या पथकाने दुपारी ३ ते ५ या वेळेत थकबाकीदारांची भेट घेतली. या वेळी बहुसंख्य गाळेधारकांनी धनादेश सुपुर्द करत तीस लाखांचा भरणा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here