जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गालगत जळगाव खुर्द शिवारात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. महामार्गा नजीक मुंजोबा मंदीराजवळ अंदाजे तिस वर्ष वयोगटातील तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
मृताचा चेहरा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मयताच्या हातावर इंग्रजीत एस जान, व एस एम तसेच स्टारचे चित्र गोंदलेले आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सदर मयत तरुणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास नशिराबाद पोलिस स्टेशनला माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले