जळगाव ते वडनगरी गावामध्ये बस सेवा सुरु करा – योगेश पाटील

0
24
जळगाव ते वडनगरी गावामध्ये बस सेवा सुरु करा - योगेश पाटील

जळगाव, प्रतिनिधी । वडनगरी येथे गावामध्ये बस सेवा सुरु नसल्यामुळे गावातील वयस्कर, गृहस्थ, महिला विशेष करुन शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने कानळदा, नंदगाव, नांद्रा, पिलखेडा,भोकर या गावाकडे जाणाऱ्या बसेस वडनगरीकडे कराव्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव तालुका संघटक योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.

वडनगरी हे गाव कानळदा,आव्हाणे रस्त्याला फक्त १ किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावाची लोकसंख्या ही जवळपास दोन अडीच हजार पर्यंत आहे. आज प्रत्येक खेड्या-पाड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस चालत असतात. परंतु आमचे दुर्देव की आमच्यागावामध्ये आजपावेतो आम्हा प्रवाशासाठी आपली महामंडळाची बस गावामध्ये आजपर्यंत आलेली नाही. त्यामुळे गावातील वयास्कर गृहस्थ, महिला विशेष करुन शाळकरी विद्यार्थी या सर्वांना येणे-जाणेसाठी १ किलो मीटर पायी फाटेवर यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच वयस्कर लोकांचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूपच हाल होत असतात. त्यातच अनेक लोक गावातून कामानिमित्त जळगाव येथे येत असतात. त्यामुळे त्यांना कामावरुन परत जाणेसाठी रात्री-अपरात्री फाट्यावरुन पायी जावे लागत असते. आमच्या गावाच्या फाट्यावरुन ज्या कानळदा, नंदगाव,नांद्रा, पिलखेडा,भोकर इ.गावांच्या बससेच्या फेऱ्या होत असतात त्यातील दोन ते तीन गावातील बसेस या वडनगरी उत्पन्नात सुध्दा त्यामुळे भर पडेल. 2-7/01 मार्ग केल्या तर गावातील लोकांची विशेष करुन विद्यार्थी वर्गाची होणारी गैरसोय वाचेल, वरील गावांपैकी दोन ते तीन बसेस या वडनगरी मार्गे वळविण्यात यावेत.

जळगाव तालुका संघटक योगेश पाटील, जळगाव तालुका उपसंघटक गोरख गायकवाड, जळगाव शहर उपसंघटक गोविंद जाधव, जळगाव शहर उपसंघटक विषाल कुमावत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here