जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या मागणीला यश” आरोग्य विभागाने घेतली तात्काळ दखल – आज श्री. स्वामी समर्थ विद्यालय कुंसुंबा येथे १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना लसीकरणला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रमोद गंगाधर घुगे ( ग्रा. प. सदस्य ), प्रा. भाऊसाहेब सोनवणे, डॉ.संजय चव्हाण ( आरोग्य अधिकारी, जळगांव तालुका ), डाँ. इरेश पाटील, डॉ. चेतन अग्निहोत्री, डाँ विकास जोशी, डाँ जयश्री सोनार, डाँ सुष्मा महाजन, मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा. हेमंत सोनार, प्रा. सुनील ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेवुन १५ ते १८ वयोगटातील मुलां, मुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.