Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव जिल्ह्यात लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी

    saimat teamBy saimat teamSeptember 30, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत 37 चे पोटकलम (1) (3) कलम जारी
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक पात्र नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

    जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज सायंकाळी कोविड- 19 लसीकरण आढावा बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

    जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात आता लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्राप्त झालेला लस साठा दोन दिवसांच्या आत वापर होईल, असे नियोजन करावे. त्यासाठी अधिकाधिक लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी रुग्ण, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिला, तरुणांचे प्राधान्याने लसीकरण होईल, अशी दक्षता घ्यावी. त्याच बरोबर ज्या गावांत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या संपूर्ण गावांचे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करावे. ज्या नागरिकांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेवून 84 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा नागरिकांची यादी आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तयार करून त्यांना तातडीने दुसरा डोस देण्यात यावा. आरोग्य विभागाने लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने एकाच दिवशी एक लाख 45 हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. ही आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने जमेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे प्राप्त होणारा लस साठा 36 तासांच्या आत पात्र नागरिकांना देण्यात येईल, असे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार लसीकरण सत्र वाढवावेत. भुसावळ तालुक्यात लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी रेल्वेच्या इस्पितळाची मदत घ्यावी. याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान पाचशे चाचण्या कराव्यात. त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर रोजी आयोजित होणाऱ्या लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्या.

    महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करावी. त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

    जळगाव जिल्ह्यास आतापर्यंत 20 लाख 33 हजार 88 कोविशील्डचे, तर दोन लाख 6 हजार 328 कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 16 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर पाच लाख 47 हजार 807 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी यावेळी दिली. ज्या तालुक्यात कोविड- 19 लस उपलब्ध आहे, अशा तालुक्यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याची सुचनाही त्यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.