चोपडा ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची नागरी पतपेढी जळगाव तसेच लोकसहकार गटातर्फे ज्येष्ठ सभासद सन्मान योजनेअंतर्गत संस्थेत चोपडा तालुक्यातील २५ वर्ष असणारे सभासद यांना ५००० रु.तथा ३० वर्ष असणारे सभासद यांना ७५०० रु.चा अशा ३४ सभासदांना धनादेश देत सत्कार पंचायत समितीमधील मिटींग हॉलमध्ये करण्यात आला.
दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे जळगावला होतो परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची सुरुवात चोपडा तालुक्यापासून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन तथा लोकसहकार गटाचे नेते मनोज पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक तथा लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर,संचालक सुनिल निंबा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे विलास नेरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ३ वर्षापासून लोकसहकार गटाची स्थापना करण्यात आली असून या गटातर्फे सभासद हिताचे असंख्य निर्णय घेण्यात आले असून यात प्रामुख्याने अपंग सभासद यांना संस्थेतर्फे १ लाख रु.कर्ज देण्यात येत असून ज्येष्ठ सभासद सन्मान निधी,ग. स.प्रबोधनी, सभासदांच्या मुलीच्या विवाहनिमित्ताने राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत प्रत्येकी ५००० रु.चा धनादेश,सावित्रीबाई फुले योजनेंंतर्गत सभासदाला एक मुलगी असेल तर १५ हजार रु. धनादेश तसेच दोन मुली असतील तर प्रत्येकी ७५०० रु.चा धनादेश चेक मुलीच्या १८ व्या वर्षापर्यत मुदतठेव पावती म्हणून ठेवण्यात येते.यावेळी सभासदांना लाभांश १० टक्के प्रमाणे देण्यात आले असून सभासद हित हेच आमच्या लोकसहकार गटाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षणीय भाषणात अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की,लोकसहकार गट संस्थेच्या व सभासदांच्या प्रगतीच्या दिशेने निर्णय घेत असून मयत सभासदांना त्यांच्या कर्जातून सूट,जनता अपघात विमा निधी १ लाखाहून ३ लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे.असे सर्व निर्णय सभासद हिताचे होत आहे.
यावेळी संचालक सुनिल निंबा पाटील यांनी तर ज्येष्ठ सभासद यांच्यातर्फे विलास पाटील,प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी धरणगावचे अधिकारी संजय धनगर, पं.स.चे माजी उपसभापती एम.व्ही.पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल अमृत पाटील,संचालक श्यामकांत भदाणे,एन.एस.पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे,कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्वास सुर्यवंशी,कर्ज नियंत्रण समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील,संस्थेचे सचिव एस.एम.पाटील,प्रशासकीय अधिकारी वाल्मिक पाटील,निंबा पाटील,अमर देशमुख,केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे सतिष बोरसे उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राधेश्याम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी आनंद बोरसे,शिवाजी बाविस्कर, दिलीप सपकाळे,नारायण शिरसाठ, संजय पाटील, रविंद्र बोरसे यासह चोपडा शाखेतील कर्मचारीवृंदानी परिश्रम घेतले.