जळगाव : प्रतिनिधी
सभासद नोंदणी अभियान अधिक सुलभ व जलद गतीने होण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. माननीय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले तसेच या कार्यक्रमाचे ट्रेनिंग जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व शहरातील सर्व चीफ एनरोलर दिनांक 22/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन येथे प्रशिक्षण शिबिराचे ठिकाणी हजर होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, जमील शेख , ज्ञानेश्वर कोडी, रितेश पाटील सुलोचनाताई वाघ जिल्ह्यातून आलेले तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व कार्यकर्ते हजर होते