जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने श्रीराम मंदिर संस्थानास लॅपटॉप व प्रिंटर भेट

0
63

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेचे सामाजिक कार्य विस्तारित असून त्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आर्थिक व्यवहार करण्यासोबतच सामाजिक कार्यात सहभाग घेणे, व्यवसायिक प्रशिक्षण आदी उपक्रमांचा सहभाग असतो.
जळगाव शहरातील जलग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान हे सुमारे ५०० वर्षांची परंपारा लाभलेले खान्देशातील प्रमुख संस्थानांपैकी एक आहे.या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांची सुंदर अशी उत्सवमूर्ती स्थापित आहे.संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याच अनुषंगाने जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने श्रीराम मंदिर संस्थानच्या कामकाजास आधुनिकतेचा हातभार लावण्याच्या अनुषंगाने काल रोजी आयोजित कार्यक्रमात लॅपटॉप व प्रिंटर भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीराम मंदिर संस्थांनचे विद्यमान गादीपती ह.भ.प.मंगेश महाराज,जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, संचालक सतिष मदाने, सुरेश केसवाणी, हरिश्‍चंद्र यादव, दीपक अट्रावलकर, कृष्णा कामठे, नितिन झवर व मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here