जळगाव चांदवड मार्गाचे काम अजून अपुर्णच

0
25

भडगाव, प्रतिनिधी । कजगाव तालुका भडगाव जळगाव चांदवड महामार्गावरील अपूर्ण काम अपघाताला आमंत्रण देत आहे, भोरटेक गावजवळ , वळणावर थांबलेल्या कामा मुळे बरेच अपघात होत असतात , जळगाव चांदवड महामार्गाचे बरेच काम पूर्ण झाले आहेत, मात्र वळणावरील सारे कामे अपूर्ण असून बंद पडली आहेत.

या खराब रस्त्यावर वळणावर अनेक अपघात झाले आहेत व बरेच मोटरसायकल स्वराना मोठी दुखापत झाली आहे , मात्र दोन ते तीन वर्षा पासून ही कामे रखडली आहे , अजून पूर्ण झाले नाही, रस्त्याच्या वळणावर खडी वर आल्याने बरेच अपघात होत असतात, जेथे काम थांबले आहे तेथे साधी डॉग जूगी ही होत नाही हे मात्र दुर्दैव, भोरटेक गावाजवळ होणार बोगद्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने वळणावरील हा रस्ता खड्डेमय झाला आहे कॉंक्रीट रस्त्यावरून सुसाट धावणारी वाहने अचानक थांबल्याने एकमेकावर धडकत आहेत , अपूर्ण कामामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कामे मार्ग लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here