Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावात 12 वर्षीय बालकाने गळफास घेत केली आत्महत्या
    क्राईम

    जळगावात 12 वर्षीय बालकाने गळफास घेत केली आत्महत्या

    saimat teamBy saimat teamJanuary 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । कांचननगर परिसरातील १२ वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेवून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मकरसंक्रात सारख्या सणासुदीच्या दिवशी ही घटना घडली. याबाबत कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
    यश रमेश राजपूत (वय १२, रा. कांचननगर) असे मृत बालकाचे नाव आहे. रमेश सुकलाल राजपूत हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह कांचननगर राहतात रमेश राजपूत हे शुक्रवारी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला गेले. त्यांची पत्नीही सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते. यश राजपूत हा घराच्या वरच्या खोलीत सकाळी १० वाजेच्या सुमारास गेला. त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना त्याची बहिण सोनीच्या लक्षात आल्याने उघडकीस आली. यशला नातेवाईकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जाहीर केले. याबाबत कळताच नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. बालकाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.