जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध परिसरात हेल्पिंग हँड्स ग्रुपच्यावतीने गोर गरिबांना फूड पाकीट वाटप करण्यात आले.
हेल्पिंग हँड्स ग्रुप हा गेले कित्येक महिन्यांपासून गरजु व्यक्तींना दर महिन्याला अन्नदान करण्यात आले. या ग्रुपमधील सर्व सदस्य हे स्वखर्चाने व डोनेशन करून हा ग्रुप चालवतात. गरजू नागरिकांसाठी जीवनाश्यक वस्तू देखील या विद्यार्थ्यांनी वाटप करण्यात आले आहे. हा उपक्रम दर महिन्यातून केला जातो. यावेळी नेहा छाडीकर, मेहुल बैसाणे , तुषार छाडीकर, मोहित इंगळे, अंजली इंगळे, तेजस छाडीकर, मयुरेश, अभिषेक चांगरे, देवांग आदी उपस्थित होते.कोणाला काही मदती चा हात लावण्या ची इच्छा असेल तर या
नंबर वर ९०२१७०७७४९ संपर्क साधा.
