Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावात शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, पोस्टेत गुन्हा दाखल
    क्राईम

    जळगावात शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, पोस्टेत गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamOctober 1, 2021Updated:October 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम मारहाण
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौक येथे शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्या तरुणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या बाहेरच टॉवर चौकात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यालाच त्याच्याच काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जमावाने पोलीस ठाण्यात देखील वाद घातल्याने तणाव वाढला होता. सहाय्यक अधीक्षक आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर निकुंभ हे गुरुवारी आपले कर्तव्य बजावून नातेवाईकांना सोडविण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले होते.

    नातेवाईकांना सोडून पुन्हा पोलीस ठाण्यात परतत असताना त्यांना काही तरुण रात्री ११ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात विनाकारण फिरताना दिसले. इतक्या रात्री कुठे फिरता असा जाब विचारत त्या तरुणांना निकुंभ यांनी हटकले असता पोलीस कर्मचारी आणि तरुणांमध्ये बाचाबाची देखील झाली. वाद वाढल्याने तरुणांनी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या दुचाकीची फायबर काठी काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाहेर आले असता त्यांनी वाद सोडवित पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्यासह अमन ढंढोरे व राजवीर ढंढोरे यांना पोलीस ठाण्यात आणले.

    यावेळी पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे व वाद घालणाऱ्या इतरांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलून अरेरावी केली. तसेच महिला पोलीस कर्मचारी किरण मालवणकर यांना वाईट साईट बोलून तुम्ही पोलीस फार मातले आहे, तुम्हाला पाहावे लागेल. मी माजी नगरसेवक आहे, माझी पॉवर तुम्हाला दाखवतो असे म्हणून धमकी दिली. पोलीस ठाण्यात जमाव आणि वाद वाढल्याने सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक हे आरसीपी पथक आणि क्यूआरटी टीमसह पोहचले व गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन जमावाला पंगविले.

    याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या फिर्यादीवरून अमन उर्फ आशुतोष ईश्वर ढंढोरे, रणवीर ढंढोरे, शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे यांच्यासह ४ अनोळखी जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. नि. क्षीरसागर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.