जळगावात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोन जणांना अटक

0
44

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वेश्या व्यवसायावर धाड टाकण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. काशिनाथ चौकानजीक असलेल्या हॉटेल अमरनाथ येथे सदर छापा टाकण्यात आला.

जळगाव शहरातील जळगाव – औरंगाबाद रोडवरील अमरनाथ लॉजीगचे मालक लॉजमध्ये पुरुषांना काही महिला उपलब्ध करुन वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या कारवाईत सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक अशिद नामदेव कांबळे (भापोसे), पो.नि.प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. राहुल रगडे, मपोकॉ आशा पांचाळ, एसडीपीओ कार्यालयातील पोलिसउपनिरीक्षक सुनिल पाटील, हे.कॉ.किरण धमके यांच्यासह इतर कर्मचारी वर्गाने या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत दोन महिला व दोन पुरुष आढळून आले आहेत. यातील राजेश मिठाराम ठोंबरे रा.सोपानदेव नगर, जुना खेडी रोड व विकास रमेश सोनवणे रामेश्वर कॉलनी या दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येकी हजार रुपये घेऊन या लॉजमधे रुम उपलब्ध करुन दिली जात होती. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक चौधरी व राजेंद्र कांडेकर पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here