जळगावात विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांची धाड

0
4

जळगाव, प्रतिनिधी । जळगावातील विविध भागातील जुगार अड्ड्यावरून पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज धाड टाकून ८ ते १० जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधूर वाडा आणि शिरसोली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज दुपारी धडक कारवाई करत सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनदास मेहता हॉस्पीटलच्या बाजूला एका दुकानावर, शनीपेठ परिसरात दोन ठिकाणी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली रोडवील जकात नाक्याजवळील शेतात अश्या चार ठिकाणी सट्टा व जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वत: कारवाईसाठी मैदानात उतरले होते. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी यांनी एका पाठोपाठ चार ठिकाणी धडक कारवाई करत ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून रोकड, सट्टा व जुगार खेळण्याचे साहित्य आणि मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here