जळगावात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने विक्री

0
12

जळगाव, प्रतिनिधी I मकर संक्रांत या सणानिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. शिवाय पतंगशौकीन देखील पतंग उडवित असतात. जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी केली असून या संदर्भात मनपाने नायलॉन मांजाची विक्री होऊ नये म्हणून पथक निर्माण केले आहे.

या पथकाने दोन तीन दिवसापासून शहरात फिरून नायलॉन मांजाची विक्री तर होत नाही ना? याबाबतची तपासणीही केली. मात्र या पथकाला हुलकावणी देऊन शहरातील काही भागात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने सर्रास विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. विशेषत: जोशीपेठेतील पतंग गल्लीत पतंगांबरोबरच नायलॉन मांजाची विक्री छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here