जळगाव, प्रतिनिधी । महाबळमधील अनुराग स्टेट बँक काॅलनीतील वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी आपल्या छंदाला आकार देत नवरात्राेत्सवानिमित्त घरातच ६ बाय ४ आकारात पाेट्रेट रांगाेळीतून दुर्गामाता रेखाटली आहे.
ही रांगाेळी त्यांनी दरराेज ३ तास वेळ काढून ६ दिवसांत म्हणजे १८ तासात पूर्ण केली आहे. यासाठी ७ किलाे रांगाेळी लागली आहे. रांगाेळीत याेग्य रंग छटा दाखवण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रांगाेळीत लेक रंगांचा वापर केला आहे. या कार्यासाठी त्यांना पती ज्ञानेश्वर बडगुजर व मुले विपुल व निखिल बडगुजर यांनी मदत केली आहे. पहिल्या प्रयत्नात रेखाटलेली आकर्षक रांगाेळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे. वैशाली बडगुजर यांना चित्रकलेची आवड असून त्या घरकाम सांभाळून प्रत्येक सणांनुसार घरात रांगाेळी रेखाटत असतात.