जळगाव ः प्रतिनिधी
शहरा लागून असलेल्या कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवार येथील नागरिक विविध समस्यांपासून मागील 5 वर्षापासून विविध समस्या जसे की पिण्याचे पाणी, रोड रस्ते, गटारी इ. त्रस्त आहेत. यामुळे शहरातील कोल्हे हिल्स् परिसरातील महिलांनी ‘जल’साठी हंडा मोर्चा काढला तर यावेळी मनसे मात्र आक्रमक झाल्या आहे.
यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाण्याची काहीएक सुविधा नाही, त्यांच्या परिसरात ज्या बोअरवेल वरुन पाणी मिळत होते त्या सुध्दा आता उन्हाळा सुरु झाल्याने त्यांची पातळी खोलवर गेली असून त्या बंद झालेल्या आहेत. मग त्यांनी जायचे कुणीकडे? तसेच संबंधित रहिवाशी नेहमी न चुकता घरपट्टी, करपट्टी इत्यादी शासनाच्या वेळेवर भरणा करीत आलेले आहेत परंतु त्यांचेकडे कुणीच लक्ष देत नाही ही त्यांची शोकांतिका म्हणावी लागेल. संबंधित सावखेडा शिवार परिसर हे ग्रामपंचायत हद्दीत येत असून तेथील सद्यस्थितीतील सरपंच व ग्रामसेवकहे त्याठिकाणी जे नविन बिल्डर परे व प्लॉट बांधतात त्यांना तात्काळ नळ कनेक्शन देतात व त्या ठिकाणचे मागील 8 ते 10 वर्षापासून जवळपास 36 घरे ही रहिवास करीत आहेत. परंतु त्यांना संबंधितांकडून पाण्याचे नळ कनेक्शन आजपावेतो दिलेले नाही. व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जे सरंपच, ग्रामसेवक व सदस्य यांचे ओळखीचे लोक आहेत त्यांना ते नळ कनेक्शन देत आहेत. तसेच त्यांचे आमदार मा. गुलाबराव पाटील यांचेकडे पाणी पुरवठा हे खाते असून सुध्दा त्यांचेच मतदार संघातील लोक हे पाण्यापासून वंचित आहेत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने महिलांसह हंडा मोर्चा काढला होता. यावेळी हा मोर्चा शहरातून आकाशवाणी चौकातून महिलांनी डोक्यावर हंडा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे व जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मनसेचे पदाधिकारी किरण तळेले, आशिष सपकाळे, रज्जाक सैय्यद, संदिप महाले, योगेश पाटील, कुणाल पवार, कुणाल पाटील, महेश माळी, जसवंत राजपुत, स्वप्निल नेरकर, विकस पाथरे, सतीश सैंदाणे, महेंद्र सपकाळे, गणेश कोळी, विशाल कुमावत, निलेश खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला उपस्थित होत्या.