जळगावात गावठी पिस्टलसह चाकूने दहशत माजविणाऱ्यास अटक

0
20

जळगाव, प्रतिनिधी । अवैध गावठी बनावटीचे पिस्टलसह धारदार चाकूने दहशत माजविणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा जळगावने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इसम गावठी बनावटीचा कटटा व धारदार चाकू बाळगून नशिराबाद गावात दहशत माजवित असलेला आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान (वय ४१, रा.प्रल्हाद नगर, रिंग रोड, १५ बंगला जवळ, भुसावळ ता. भुसावळ जि.जळगांव) याला अटक केले आहे.

पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक, अमोल देवढे, संदिप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, परेश प्रकाश महाजन, रविद्र रमेश पाटील यांच्या पथकाने नशिराबाद गावातील बस स्थानकाजवळ आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान याला अटक करून एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू विनापास परमिटशिवाय बेकायदेशीरपणे व अनाधिकृतपणे बाळगतांना मिळून आला म्हणून त्याच्या विरुध्द नशिराबाद पो.स्टे. येथे गुरनं. १५८/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीवर पाच गुन्हे दाखल असून तो फरार होता.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी, अमोल देवढे, पोहेकॉ. २७०७ संदिप रमेश पाटील, पोना. २३०६ प्रविण जनार्दन मांडोळे, पोना. १५८८ परेश प्रकाश महाजन व पोना. २९९३ रविंद्र रमेश पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here