जळगावात ‘आरटीओ’ची ३१ लक्झरींवर कारवाई

0
32

जळगाव ः प्रतिनिधी
उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे (आरटीओ) काल रात्री ९ ते १०.३० वाजेच्या दरम्यान ३१ लक्झरी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर तीन बसेस जप्त करण्यात आल्या. ही मोहीम राज्यभरात एकाच वेळी राबवण्यात आली. लक्झरी बसेसची साइज वाढवणे, टॅक्स न भरणे, फिटनेस सर्टिफिकेट नसणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली.
आरटीओ श्याम लोही यांच्या नेतृत्वाखाली वाहन निरीक्षक देशमुख यांच्यासह पथकाने मोहिम राबवली. यात प्रामुख्याने गुजरात राज्यात जाणार्‍या लक्झरींवर कारवाई करण्यात आली. यात जामनेर-सुरत या मार्गावरील १४-०५०२ या साईराम ट्रॅव्हल्स ,मुक्ताईनगर-अहमदाबाद या मार्गावरील शुभ ट्रॅव्हल्स ( जीजे ०५ एव्ही ८५०२) व शिव ट्रॅव्हल्स (जीजे ०१ डी झेड १५१५) या तीन लक्झरीतील प्रवाशांना उतरवून लक्झरी जप्त करुन आरटीओ कार्यालयात आणल्या. तर दोन लक्झरीतील प्रवाशांना भाडे परत देवून हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली, असे शुभ ट्रॅव्हल्सचे चालक सुनिल पाटील यांनी सांगितले तर शिव ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना दंड भरून सोडण्यात आलेल्या बसमध्ये व्यवस्था करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here