जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील बगिच्यामध्ये विहिरीजवळ एक ५५ – ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहे.
सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी, साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील, नरसिंग पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. पोलीस मित्र समाधान नाईक व राहुल कोळी यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. सदरचा अनोळखी मयत इसम हा गेल्या तीन दिवसापूर्वी विहिरीत पडून मयत झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
