जळगाव । नेरी नाका परिसरातील एका जणाची 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगुराम प्रभूदयाल कुमावत (वय 58, रा. वर्षा कॉलनी, मोहाडीरोड) यांच्याकडे मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीवाय 4299) आहे. ते सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळ काही कामानिमित्त गेले होते. ते सायंकाळी 5 वाजता काम आटपून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची पार्किंगला लावलेली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहेत.