जळगाव, प्रतिनिधी । आज दि.१९ रविवार रोजी अनंत चतुर्दशी दिनी जळगाव शहरातील श्री.गणेशाचे विसर्जन ११ व्या दिवशी मेहरूण तलावात संपन्न झाले, या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषद व नीर फाऊंडेशन यांच्यावतीने मेहरूण तलाव परिसरात विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन करत नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यात आली.
मेहरूण तलावावर घरगुती व गणेश मंडळाच्या मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांकडून ३ तासाच्या कालावधीत तब्बल ४ ट्रॉली निर्माल्य संकलन करुन मनपाच्या निर्माल्य संकलन पथकाकडे सोपविण्यात आले. ‘सदर उपक्रम भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री.प्रशांत गूरव सर यांच्या संकल्पनेतून तथा राज्य उपाध्यक्ष ॲड.राहूल वाकलकर सर यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला’.
निर्माल्य संकलनासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष अविनाश जावळे, महासचिव तथा नीर फाऊंडेशनचे संस्थापक सागर महाजन, सचिव आकाश धनगर, आकाश पाटील, समन्वयक इरफान पिंजारी, भावेश रोहीमारे, नयनकुमार पाटील, जळगाव शहराध्यक्ष सौरभ जैन, शहर महासचिव रोशन मुंडले, शहर समन्वयक रविंद्र सपकाळे, विनय दूग्गड, गौरव निकम, आशिष सोनार, मयुर कोळी यांनी परीश्रम घेतले,