जळगाव : प्रतिनिधी
बदलत्या युगात लहान मुला-मुलींच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार नाट्य, नृत्य, वत्कृत्व, चित्र व इतर कलांचे योग्य मार्गदर्शन व्हावे, कृतीशील शिक्षणातून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशातून अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेच्या संलग्न बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली. बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रकाश पारखी व सहकार्यवाह सतीश लोटके यांच्या मान्यतेने बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार मार्गदर्शक अॅड.रोहिणीताई खडसे खेवलकर, अध्यक्ष – योगेश शुक्ल, उपाध्यक्ष (उपक्रम) – हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (संस्थात्मक कामकाज) – संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह – विनोद ढगे, सहकार्यवाह – वैभव मावळे, सचिव – अमोल ठाकूर, सहसचिव – आकाश बाविस्कर, कोषाध्यक्ष – सचिन महाजन तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिपक महाजन, आरती गोळीवाले, नेहा वंदना सुनिल, स्वप्ना लिंबेकर, सुदर्शन पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जळगाव येथे विनोद ढगे यांच्या माध्यमातून बालरंगभूमी परिषदेची शाखा सुरु करण्यात आली आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेच्या माध्यमातून लवकरच बालकलाकारांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आदींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी सांगितले.