जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील हे “कार्यकर्ता परिवार संवाद यात्रा“ या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्यावर होते.यावेळी त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते व शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले योगेश देसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सौ.पौर्णिमा देसले यांनी त्यांचे औक्षण करत देसले कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी देसले कुटुंबियांशी निवांतपणे गप्पा करत आस्थेवाईकपणे विचारपूस केली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,राष्ट्रवादी ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, माजी आमदार मनीष जैन, संजयदादा गरुड, डॉ.रिझवान खाटीक,राजू मोरे,भरत कर्डीले, किरण राजपूत, किशोर पाटील,राजेश गोयर, यशवंत पाटील,पंकज देसले, अजय पवार व वृंदावन परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष महोदयांनी दिलेली सदिच्छा भेट म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने दिलेली ही अनमोल पावती आहे असे योगेश देसले यांनी ‘साईमत’शी बोलताना सांगितले.