विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
जरंडी,निंबायती परिसरात तीन दिवसापासून भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतांना सोमवारी रात्री जरंडी गावालगतच्या शेतात वेचणी करून ठेवलेला कापूस आणि निंबायती भागात तीन वीजपंप चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांची रात्रीची गस्त वाढलेली असतांना देखील चोरटे मात्र पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डल्ला मारत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
जरंडी आणि निंबायती परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे एकाच रात्री शेतकऱ्याचा वेचणी करून ठेवलेल्या कपाशी सह तीन वीजपंप चोरी झाले आहे जरंडी गावालगत असलेल्या शेतात शेतकरी दिलीप पाटील यांनी वेचणी करून ठेवलेला दोन क्विंटल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे कापसाची चोरी करतांना बाजूच्या शेतातील तारेचे कम्पाऊंड पार करून कपाशीचे गासोडे अज्ञातंनी फरारी केल्याचे मंगळवारी पहाटे उघडकीस आले या कपाशीच्या गाठोड्यातून कापूस खाली पडलेल्य अवस्थेत आढळून आला होता.निंबायती भागातही तीन शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून वीजपंप चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे परिसरातील शेताकार्त्यांची चिंता वाढली असून मात्र रात्रीची गस्त वाढविलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.कोरोना संसर्गाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती आणि सोयगाव शहराची निवडणूक यामध्ये पोलीस गुंतले असतांना मात्र चोरट्यांनी सर्रास डल्ला सुरु ठेवला आहे.यावर प्रतिबंध घालण्यासाठी पुन्हा सोयगाव पोलीस सतर्क झालेले असून शेतकऱ्यांनी शेतातील वस्तूंवर लक्ष ठेवून काही संशयित प्रकार आढळल्यास सोयगाव पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.