जय भवानी जय शिवराय च्या जयघोषात काशिनाथ पलोड स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

0
25
 विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड मध्ये महाराष्ट्राचे दैवत असलेले  छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीच शाळेचे प्राचार्य श्री गणेश पाटील शाळेच्या समन्वयिका सौ.संगीता तळेले सौ.स्वाती अहिरराव, सौ.अनघा
सागडे यांच्या हस्ते छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर शाळेच्या संगीत शिक्षिका सौ.स्वाती देशमुख व शिक्षक श्री. गणेश देसले, श्री. रवींद्र भोईटे यांनी व विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. आजच्या दिवसाचे औचित्य साधत पुण्याचे डॉ. सुनिल रूपचंद धनगर यांचे इयत्ता सहावी ते नववी या विद्यार्थ्यांसाठी तरुणांनी शिवचरित्रातून शिकावे? या विषयावर  व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले .या व्याख्यानात डॉ. धनगर यांनी शिवाजी महाराज यांच्यात असलेले गुण विद्यार्थी दशेतील मुलांना देखील उपयोगी आहे व त्या गुणांचा वापर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कशाप्रकारे केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगाचे उदाहरण सांगून ते पूर्ण जगात वंदनीय का आहेत हे सांगितले तर युगल पाटील, ऋग्वेदा काबरा,विधी कीनगे, स्वराली कुलकर्णी, अक्षत मोमाने या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीची माहिती सांगितली तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा व नृत्य सादर केले व मंजिरी कामठे हिने शिव स्तुति गीत सादर केले. सौ मीनाक्षी देवताळे यांनी शिवाजी महाराजांची माहिती व त्यांची शौर्य कथा सांगितली .आदित्य चौधरी ह्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा तर अद्वैता माळी हिने जिजा मातेची वेशभूषा केली.यानंतर शिवाजी महाराजांची घोड्यावरून मिरवणूक काढली व लेझीम ,झेंडा,मशाल यांचे सादरीकरण केले. यानंतर विधी  किनगे या विद्यार्थिनीने दिलेल्या शिव गर्जनेने  कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मनोज भादूपोता  व निमिष कुलकर्णी यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रमुख  सौ. मीनाक्षी देवताळू , सौ कांचन सरोदे श्री.मनोज भादूपोता, श्री गणेश देसले, श्री भूषण खंबायत हे होते. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. गणेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here