जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धरणगाव तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव भोलाणे यांनी विभूषित केले.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक आत्माराम पाटील,मुख्याध्यापक प्रशांत नेमाडे तसेच ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र चौधरी,विकास शिरसाट,वाय.जी. पाटील,आर.टी.माळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले