जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जळगाव जनता सहकारी बँकेच्या कर्मचार्यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सहभाग नोंदवावा या हेतूने रु.३११०००/-रूपयांचा निधी फैजपुर मंदिर संस्थानाचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व श्रीराम मंदिर संस्थानचे श्रीराम महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरतदादा अमळकर, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृती प्रतिष्ठान चे सचिव रत्नाकर पाटील, संचालक सतिष मदाने, दीपक अट्रावलकर, कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, अधिकारी बापूसाहेब महाले, कपिल चौबे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात जळगाव जनता सहकारी बँकेच्या कर्मचारी वर्गाने दिलेल्या निधीस अनुसरून उद्भोदन करताना जळगाव जनता बँक परिवार हा चांगल्या विचारांच्या व्यक्तींनी प्रेरित असल्याने अशी चांगली कार्य केली जातात. समर्पणाच्या भावनेतून दिलेल्या या निधीचा उल्लेख भविष्यात देखील केला जाईल व श्रीराम मंदिर संस्थानाच्या
उभारणी कार्यात जळगाव जनता सहकारी बँकेने दिलेले योगदान हे खारीचा वाटा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री भरतदादा अमळकर यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान चे सर्व प्रकल्प व त्यातील कर्मचारी हे समर्पण भावनेतून काम करीत असतात व आपल्या परीने सर्व कार्यात आपला सहभाग देत असतात असे
नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक जळगाव जनता सहकारी बँक कर्मचारी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब महाले यांनी केले.