चाळीसगाव (वार्ताहार)-आज दिनांक 16 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात चाळीसगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठक आयोजित कण्यात आली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच खरजई गावचे दिपक शेटे व माळशेवगा गावचे रमेश पाटील यांना तालुक्याची जबाबदारी द्यावी कारण त्यांचे समाजकार्य आम्ही जवळून बघितले आहे. असे मत मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांना चाळीसगाव शहर मराठा महासंघ च्या वतीने विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हाध्यक्ष भोसले यांनी *चाळीसगावतालुकाध्यक्षपदी दीपक शेटे, चाळीसगाव तालुका संघटक पदी रमेश पाटील यांना नियुक्ती पत्र देऊन दिपक शेटे, रमेश पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व तुमच्या हातून मराठा समाजाच्या हिताचे कार्य व्हावे अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.बी बी .भोसले यांनी व्यक्त केली*. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी . भोसले , चाळीसगाव शहर अध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष जगदीश वाघ, शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, सल्लागार नामदेव तुपे, शहर संघटक मोतीराम माडोळे, गणेश गुंजाळ, हिरापूर रोड विभागप्रमुख दिलीप गवळी, घाट रोड विभाग प्रमुख संजय पाटील, प्रसिद्धीप्रमुख सागर जाधव चाळीसगाव शहरातील सन्माननीय सदस्य पंडित पाटील, दिलीप आहिरे, सागर बोरसे तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खरजई गावचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बापूसाहेब काळे देखील उपस्थित होते.
Attachments area