छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक बडोदा रस्ता पूर्ववत सुरू

0
16
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक बडोदा रस्ता पूर्ववत सुरू

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड मार्गावरील बँक ऑफ बडोदा समोरील ४० वर्ष जुनी गटार ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठा तलाव साचत होता. यामुळे वाहन धारकांचे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सदरील गटारींतील घाण – कचरा काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक ऑफ बडोदा पर्यंतचा रस्ता दुरुस्ती सुरुवात करण्यात आली होती. या कामासाठी साधारणपणे 2 ते 3 दिवस लागू शकतात असा प्राथमिक अंदाज असल्याने दोन दिवसांसाठी सदर मार्गावरील वाहतूक देखील वाहतूक देखील वळवण्यात आली मात्र जवळपास 10 फूट खोल व 6 फुट रुंद असलेली 40 वर्ष जुनी गटार साफसफाई करण्यासाठीच 2 दिवस वेळ गेल्याने शहरात वाहतूक कोंडीचा मोठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी कंबर कसली.

सलग 3 दिवस व 3 रात्र स्वतः उभे राहून या रस्त्याचे दुरुस्ती काम पूर्ण केल्याने आज दि.6 ऑक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बडोदा बँकेचा रस्ता शहरवासीयांसाठी खुला करण्यात आला. आज दि.6 रोजी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडल्यानंतर देखील पाणी तुंबले नाही व गटारीतुन सर्व पावसाचे पाणी वाहून गेले. वाहनधारकांना सर्वात डोकेदुखी ठरणारा हा भाग दुरुस्त झाल्याने वाहन धारकांची मोठी सोय झाली असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टप्प्या टप्प्याने शहरातील इतर रस्ते देखील दुरुस्ती केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here