चौबे मार्केटमधील गाळेधारकांच्या घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष

0
35

जळगाव ः प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाकडून गाळे भाडे थकबाकीपोटी करण्यात येत असलेल्या सीलच्या कारवाईच्या विरोधात शहरातील १६ अव्यावसायिक मार्केट बंद ठेवले असून रोज वेगवेगळ्या मार्केटमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी चौबे मार्केटमधील गाळेधारकांनी घंटानाद आंदोलन केले.
दुपारी गाळेधारकांनी दुकानासमोरील पत्र्यांच्या छतावर चढून घंटा वाजवून मनपा प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. यामुळे रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.
धर्मशाळा मार्केट गाळेधारकांची विनंती
धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना महिना २५ हजार भाडे कसे भरणार असा सवाल उपस्थित केला आहे. २०१३ पर्यंत दरमहा ६ हजार रुपये भाडे भरलेले आहे. पालिकेने आता सर्व भाडे व ट्रॅक्स मिळून प्रतिवर्षी २ लाख ४०० रुपये प्रमाणे आदेश काढले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना एवढी रक्कम भरु शकत नसल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here