चौधरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
7

जळगाव, प्रतिनिधी । येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

डॉ. कलाम यांचे प्रतिमेस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील याचे हस्ते माल्यापर्ण करण्यात आले सदर प्रसंगी प्रा डॉ. आर.एस. खडायते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे उपस्थित होते. डॉ. शिरीष पाटील यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय व त्यांचे प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच त्यांनी डॉ. कलाम लिखित ”अग्निपंख” या पुस्तकातील “माणसाच्या प्रगतीत मांजर आडवे जात नाही तर माणसेच आडवी जातात” असे कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रंथपाल प्रा. सुनील पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद काळे यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्य्लाचे क्रीडा संचालक डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य रेखा भोळे, प्रा. प्रिती पाटील, प्रा. डॉ. रवींद्र लढे, प्रा.कुमुदिनी पाटील, प्रा. तृप्ती काळे, डॉ. राजकुमार लोखंडे, प्रा.राजश्री पाचपांडे, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. वासंती ढाके प्रा.विकास उंबरकर, सहाय्यक ग्रंथपाल प्रविण अंबुसकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here