भडगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागात चोरी झालेल्या घटनेतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी या तिघांविरुद्ध भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. भडगावातील यशवंतनगर भागात अर्जून भिल्ल यांचे घर फोडून चोरांनी ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या गुन्यातील तीन संशयित सुनील परशुराम पवार (वय २२), अनिल विरभान सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाइल आणि चार हजार रुपये रोख हस्तगत केले आहे.
संशयितांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स फौ अशोक महाजन, हे कॉ लक्ष्मण पाटील, पो ना रणजित जाधव, नंदलाल पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, विनोद पाटील, श्रीकृष्ण देशमुख, चालक पवार आदींच्या पथकाने केली आहे.