चोपडा – महाराष्ट्र नाभिक महामंडळ चोपडा शाखेमार्फत वीर जिवा महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्व पदाधिकारी व नाभिक समाजबांधवांनी वीर जिवा महाले यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम, चोपडा तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, शहराध्यक्ष सोपान बाविस्कर, देविदास बाविस्कर, माजी शहराध्यक्ष मनोहर सोनगिरे, राजेंद्र येशी, शत्रुघ्न सोनवणे, बाला निकम, धनराज पगारे, गणेश खोंडे, लक्ष्मण बाविस्कर, अनिल पगारे, अनिल सैंदाणे, मानव सैंदाणे,भूषण जगताप, गोकुळ सोनवणे, निंबा वाघ, प्रमोद सोनगिरे, हिरालाल सोनवणे, राहुल निकम आदिंसह इतर समाजबांधवांची उपस्थिती होती.