Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपड्याच्या तापी सह.सूतगिरणीला दहा कोटींची केंद्र शासनाची सबसिडी
    चोपडा

    चोपड्याच्या तापी सह.सूतगिरणीला दहा कोटींची केंद्र शासनाची सबसिडी

    saimat teamBy saimat teamDecember 31, 2020No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी
    येथील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला सुमारे १० कोटी रुपयांची एकरकमी सबसिडी मिळाल्यामुळे प्रकल्प आर्थिक चणचण संपून स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करणार आहे. तालुक्यातील सभासद व शेतकर्‍यांना सुतगिरणीचा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून स्वतःची जिनिंग प्रेसिंग कार्यस्थळावर सुरु करणार असल्याची घोषणा करीत १५ दिवसात भुमिपूजन करणार असल्याचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
    कैलास पाटील म्हणाले की, सूतगिरणी प्रकल्प तालुक्याला वैभवशाली बनविण्याकडे वाटचाल करीत असतांना सद्यस्थितीत १०० कोटींचा प्रकल्प उभा झाला आहे. सुतगिरणी उभी करताना राज्य शासनाची मोठी मदत झाली. २७ कोटी रुपये भागभांडवल शासनाने उपलब्ध करुन दिले. शेतकर्‍यांनी तीन करोड रुपये भाग भांडवल उपलब्ध केले. त्यामुळे चोपडा तालुक्यात सूतगिरणीचा युवकांना रोजगार देणारा प्रकल्प उभा राहू शकला. त्यासाठी एनसीडीसीने ४४ कोटींचे कर्ज मंजूर करुन खूप मोठा हातभार लावला. आपल्या प्रकल्पाची सुरूवात २३ मार्च २०१७ ला झाली आणि पहिल्या आर्थिक वर्षांपासून केंद्र शासनाच्या वस्त्रोोद्योग मंत्रालयाने आपल्याला सबसिडीची रक्कम देवू केली.
    यामध्ये २०१६-१७ ला ९० लाख ५८ हजार ४०० रुपये तर २०१८-१९ ला ३२ लाख १९ हजार ४०० रुपये सबसिडी प्राप्त झाली. तसेच २०१९-२० मध्ये ६४ लाख ८६ हजार ७०० रुपये व ८५ लाख रुपये सबसिडी प्राप्त झाली. तथापि केंद्राकडे राहिलेली सबसिडी सात वर्षे टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याची करारात अट होती. परंतु अशा कालावधीने सबसिडी मिळाली तर प्रकल्पाचा मोठा भाग व्याजात जाईल. त्यामुळे सूतगिरणी स्वयंपूर्ण होण्यात अडचण येईल. याचा विचार करुन व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील व संचालक मंडळ सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न करुन सबसिडीची रक्कम लवकरात लवकर एकरकमी मिळावी म्हणून दिल्लीत जावून कसोशीने प्रयत्न केले. त्याला यश आले असून सूतगिरणीला एनसीडीसीने ९ कोटी ९० लाख ३० हजार ५०० रुपये सबसिडी खात्यावर प्राप्त झाल्याची माहिती पत्राव्दारे कळविली आहे. त्यामुळे सूतगिरणीची आर्थिक चणचण संपणार असून प्रकल्प आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असा विश्वास चेअरमन कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
    राज्याची सबसिडीही
    लवकरच मिळविणार
    सूतगिरणीने २५ हजार ९०० खाते पूर्ण क्षमता असलेले उद्दिष्ट देखील नुकतेच पार केले आहे. सक्षमपणे पूर्ण क्षमतेने सूतगिरणी चालू असल्याचे परिक्षण एनसीडीसीकडून झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शासनाला सादर केल्यानंतर सुमारे १८ कोटीची सबसिडी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या सबसिडीची रक्कम त्वरित मिळावी म्हणून कंबर कसणार असल्याचे चेअरमन कैलास पाटील यांनी सांगितले.
    येत्या १५ दिवसात जिनिंग प्रेसिंगचे होणार भुमिपूजन
    तालुक्यात शेतकर्‍यांच्या योगदानातून सूतगिरणी सुरु झाली.पण त्याचा काय फायदा? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत होता.त्याचा विचार सूतगिरणी संचालक मंडळाने वारंवार केला. तेव्हा काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍यांच्या पांढर्‍या सोन्याला अधिक मोबदला देता यावा म्हणून आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सूतगिरणी संचलित ‘रेलचा मारुती जिनिंग प्रेसिंग’ सुरु करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. आगामी पंधरा दिवसात जिनिंग प्रेसिंगचे भुमिपूजन करणार असल्याची घोषणा माजी आ.कैलास पाटील यांनी यावेळी केली.
    यावेळी व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील, संचालक प्रकाश रजाळे, तुकाराम पाटील, डिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, राहुल बाविस्कर, के.डी.चौधरी, शशिकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, भागवतराव पाटील, रामदास चौधरी, रंजना नेवे, जागृती बोरसे, जनरल मॅनेजर विजय पाटील, सूतगिरणीतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.