जळगाव : विशेष प्रतिनिधी
चोपडा- शिरपूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याच्या शासकीय जागेत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकारीने दांडगाई करत अधिकाराचा गैरवापर करून भागीदारीने कॅन्टीनचा व्यवसाय सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अनेक वेळा संबंधित खात्याचे जबाबदार अधिकारी गणेश पाटील यांना सदराचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भात शिवसैनिकांच्या मागणीवरून आमदार लताताई सोनवणे यांनी सूचना करूनही त्यांनी या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यामुळे शिवसैनिकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या उन्मत्त अधिकार्याच्या वागण्याविरोधत आता शिवसैनिकांनी देखील कार्यकारी अभियंता सोनवणे यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते शासकिय विश्रामगृहाच्या व्हिआयपी रूममध्ये वडा पाव व मिसळचा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अधिकरी गणेश पाटील व शिवसैनिक यांच्यात जबर संघर्ष निर्माण झाला आहे.सार्वजानिक बांधकाम विभागात उपअभियंता गणेश पाटील हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत.मुक्ताईनगर येथे असतानाही त्यांनी अनेक गैरव्यवहार केले आहेत.त्यांची चौकशी देखील चालू आहे.अशा ह्या गैरव्यवहार करणार्या , नेहमीच वादग्रस्त असणार्या अधिकार्यावर् कारवाई का होत नाही? की वरिष्ठ अधिकारी देखील गणेश पाटील यांच्या गैरव्यवहारात सामील आहेत असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधींच्या सूचनेचा अनादर करणे, काम न करता बिले काढणे, दुसर्या अधिकर्याच्या अधिकार क्षेत्रांत हस्तक्षेप करून स्वतःच्या हस्ताक्षराने बिले काढणे, शासकिय पदावर असताना पदाचा गैरवापर करून शासकिय मालमत्तेचा दुरुपयोग करणे या सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या दृष्टीक्षेपात असतानाही संबंधितांकडून दुर्लक्ष का केले जात आहे, बांधकाम खात्याला नेहमीच वादाच्या भोवर्यात ओढणार्या अधिकार्याचे लाड कोणत्या अभिलाषेपोटी खात्याच्या वरिष्ठअधिकार्यांकडून केले जात आहेत? या संदर्भात लवकरच विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता नाशिक यांचे कडे लेखी तक्रार शिवसैनिक करणार असल्याचे समजते.
शासकिय जागेत संबंधित अधिकार्याने भागीदारीने सुरू केलेली हॉटेल अन् शासकिय विश्रामगृहाच्या व्हीआयपी रूम मध्ये वडा पाव , मिसळचा व्यवसाय सुरू करण्याचा शिवसैनिकांनी घेतलेला निर्णय यामुळे मोठा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी तात्काळ दखल घेवून वेळीच या उन्मत्त अधिकार्यावर कारवाई करून निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे.अन्यथा“ दाल मे कुछ काला है“ यावर नक्कीच शिक्का मोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही. गणेश पाटील यांची प्रलंबित असलेल्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाची देखील तातडीने चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी देखील तक्रारदाराने केली आहे.