चोपडा ः प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालयातर्फे ‘विकेल ते पिकेल’ योनजे अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पनेवर आधारीत शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी आर.आर.चौधरी व नगरपालिका मुख्याधिकारी, अविनाश गागुंडे, पं.स.मुख्याधिकारी श्री.कासोदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा महेंद्र साळुंखे, महेंद्र महाजन, कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषि विभागातील सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
याप्रसंगी बळीराजा सेंद्रिय शेती गट हातेड, श्रीसमर्थ सेंद्रिय गट चुंचाळे, भूमिपुत्र शेतकरी स्वयंम साहाय्यता गट चुंचाळे, उनपदेव शेतकरी गट अडावद यांच्यामार्फत सेंद्रीय भाजीपाला विक्री करण्यात आले. त्यात मशरूम, ब्रोकोली, ओली हळद या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली. तसेज ग्राहकांनी शेतकरी गटाचे संपर्क नंबर शेतकर्यांकडून घेतले. या कार्यक्रमात, शेवगा, कांदा, टोमॅटो, पेरू, तूरडाळ, उडीद डाळ, चणा डाळ, कारले, दुधी भोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका, गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.