चोपडा, प्रतिनिधी । मागील दोन वर्षांपासून कोरोना सारख्या संकटाच्या काळामुळे ऑनलाइन शाळा, क्लासेस आणि मोबाईल याला कंटाळलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रा. स्व. संघाने एक जानेवारी पासुन (शनिवार आणि रविवार ) दोन दिवसीय हिवाळी शिबीर शहरातील बालमोहन विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
यात विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व मैदानी खेळ, देशभक्तीपर गीते , राष्ट्रीय विषयांची मांडणी ,शालेय विद्यार्थी आणि सोशल मीडिया इत्यादी अनेक गोष्टी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा आणि कोरोना सारख्या संकटाला मात देण्यासाठी त्यांची मानसिक स्थिती बळकट व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहर आणि तालुक्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. अशी चोपडा तालुका संघ चालक डॉ. मनोज साळुंखे यांनी माहिती दिली.