चोपडा ः प्रतिनिधी
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी सी-२ सर्वे घेण्यात येतो. वेळोवेळी महाविद्यालयानी जागतिक स्तरावर शैक्षणिक बदलांना अनुसरून केलेल्या बदलांचा मागोवा घेऊन याचे मानांकन देण्यात येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकमेव चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाला सुवर्ण मानांकन प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयाला २०१६ पासून एनबीए मानांकन मिळाले असून महाविद्यालय नेहमी विद्यार्थी केंद्रीत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून त्याचेच प्रमाण हे असून या यशाचे श्रेय हे संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयाचे भागधारक, एमओयू पार्टनर्स, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गौतम वडनेरे यांनी दिली.
सन २०१६ पासून एनबीए मानांकनाला अधीन राहून व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक यांच्या पाठिंब्यामुळे महाविद्यालयात सन २०२०-२०२१ पासून विनाअनुदानित तत्वाने डी- फार्मसी अभ्यासक्रम ६० च्या क्षमतेने सुरू करण्यात आला आहे.सोबत १९९२ पासून बी. फार्मसी, एम फार्मसी व पीएचडी असे औषध निर्माण शास्त्रातील सर्व अभ्यासक्रम शिकविले जातात. विद्यार्थ्यांनच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सहकारी नेहमी प्रयत्नशील असतात.
या यशाचे कौतुक व सर्वाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील, सचिव डॉ.स्मिताताई पाटील, सर्व कार्यकारी संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.प्रा.गौतम वडनेरे यांनी केले.