Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा घात
    क्राईम

    चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा घात

    saimat teamBy saimat teamSeptember 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर : प्रतिनिधी – शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील राहणाऱ्या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून  मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाचा पोटात चाकू खुपसून खुन केल्याची हृद्यद्रावक घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याघटनेमुळे परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान झालेल्या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत परीसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

    अधिक असे की, शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब यादव रावणचवरे आपल्या कुटूंबीयांसोबत रहिवासाला आहे. त्याच्या सोबत घरात त्याची एक विवाहीत मुलगी देखील एका वर्षापासुन कौटूंबीक वादामुळे माहेरीच राहत आहे. याबरोबर गुलाब यांचा पुतण्या प्रकाश रावणचवरे हा देखील त्यांच्याकडेच वास्तव्यास होता. काल रात्री मुलगी  लक्ष्मी हरीषचंद्र सरीशे वय अठरा, व पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे वय तेवीस  या दोघांसोबत गुलाब रावणचवरे याचे काही कारणावरून वादंग सुरू झाला. शाब्दीक चकमक  हमरीतुमरीवर येत हामाणारी पर्यंत पोहचली. या भांडणात  लक्ष्मी व प्रकाश या दोघांनी मिळून गुलाब रावणचवरे यास बेदममारहाण केली. त्याच वेळेस प्रकाश याने गुलाब रावणचवरे यांच्या पोटात  छातीमध्ये चाकुने सपासप वार केले. या घटनेत गुलाब हे गंभीर जखमी झाले मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. झालेली घटना गुलाब रावणचवरे यांच्या तेरा वर्षीय मुलगी वैष्णवी हीने पाहीली होती. तिने तात्काळ घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्यात जावून कथन केली. घटनेची माहिती कळताच संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेसंदर्भात वैष्णवी हिने दिलेल्या फियादीवरून मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो.नि.प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री.बोराडे हे तपास करीत आहेत.

    दरम्यान लक्ष्मी शिरसे ही विवाहीत असून ती गेल्या एक वर्षापासुन आई वडीलांकडेच राहत होती. प्रकाश रावणचवरे हा गुलाब यांच्या चुलत भावाचा मुलगा असुन तो देखिल त्यांच्याकडे वास्तव्यास होता. शिवाय प्रकाशची आई ही गुलाब यांच्या पत्नीची सख्खी बहिण देखिल आहे. प्रकाश व लक्ष्मी हे तरूण असल्याने दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चा परीसरात सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. याच अनैतिक संबधांचा उलगडा गुलाब रावणचवरे यांना झाला असावा असा अदांज वर्तविला जात आहे. यातून ही हत्या घडली असावी या दिशेने पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस सुत्रांतून सांगण्यात आले. दरम्यान लक्ष्मी व प्रकाश या दोघांनाही पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील कामकाज उशिरापर्यंत सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.