चुंचाळ्यात कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा

0
8

जळगाव : वृत्तसंस्था
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात रविवारी गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. पहाटे काकडा आरतीसह विविध धार्मिक विधी पार पडले. होम हवनानंतर वासुदेव बाबा भजनी मंडळाने भजने सादर केली. कोरोनाच्या संकटापासून जगाला मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे येथे, रविवारी वैशाख शुध्द बारसनिमित्त गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार येथील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. साजरा होणारा गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पहाटे, मंदिरातील पुजारी यांच्याहस्ते अभिषेक व काकड आरती झाली. त्यानंतर होम हवन संपन्न झाले. त्यानंतर वासुदेव बाबा भजन मंडळातर्फे बाबांच्या चरणी भजने सादर करण्यात आली. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साधेपणाने पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here