चाळीसगाव प्रतिनिधी मुराद पटेल
शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसिल कार्यालयाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाला चाळीसगाव मतदारसंघाचे जनसेवक आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून नवचैतन्य प्राप्त झाले. लोकप्रतिनिधी व प्रशासन एकत्र आले तर काय सकारात्मक बदल होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सदर चौंक सुशोभीकरण काम होय.!!! आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून १६ लाख रुपये खर्चून झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक व तहसीलदार कार्यालय – चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.२६/०२/२०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने जेष्ठ विचारवंत तथा सावरकर अभ्यासक प्रकाशजी पाठक यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित जाहीर व्याख्यानं देखील आयोजित करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे असणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अपर पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मुख्याधिकारी, चाळीसगाव नगरपरिषद यांची असणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहर वासीयांना त्रासदायक ठरणाऱ्या खराब रस्त्यांच्या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांच्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत यशस्वी समन्वय घडवून आणत शहरातील ५ प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे व त्याचे कार्यारंभ आदेश देखील मिळविले आहेत.
सर्वाधिक रहदारी व वापर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतचा स्टेशन रोड दुरुस्तीसाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या सर्व प्रमुख ६ रस्ते विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि.२६ फेब्रुवारी रोजी आयोजित केला असून त्यानिमित्ताने आमदार निधीतून शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार ती कामे पुढीलप्रमाणे…
१ – गणेश रोड ते छ.शिवाजी चौक पर्यंतचा रस्ता डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १२.९५ लक्ष
२ – कॅप्टन कॉर्नर ते गणेश रोड पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – ११.७८ लक्ष
३ – आमदार निधीतून भोले मेन्स पार्लर ते शिंदे हॉस्पिटल मिलगेट पर्यंत आरसीसी गटार बांधकाम उद्घाटन किंमत – ६ लक्ष
४ – भडगाव रोड कॅप्टन कॉर्नर ते घाटे पेट्रोल पंप पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १९.४३ लक्ष
५ – हिरापूर रोड नवजीवन मॉल ते तिरंगा पूल रिंग रोड पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – २९.४८ लक्ष
६ – आमदार निधीतून चौधरी वाडा येथील श्री.संत संताजी जगनाडे महाराज प्रवेशद्वार भूमिपूजन किंमत – १० लक्ष
७ – आमदार निधीतून प्रभाग क्र.५ मधील चौधरी वाडा एकदंत चौक (महादेव मंदिर) जवळील चौक सुशोभीकरण करणे- भूमिपूजन किंमत – ४ लक्ष
८ – आमदार निधीतून बँक ऑफ बडोदा समोरील धोकेदायक ४० वर्ष जुन्या अंडर ग्राउंड गटार दुरुस्ती कामाचे लोकार्पण किंमत – ७ लक्ष
९ – आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतचा डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – ३० लक्ष
१० – अंधशाळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, तहसिल कार्यालय पर्यंतचा रस्ता डांबरी रस्ता दुरुस्त करणे – भूमिपूजन किंमत – १४.३ लक्ष
११ – आमदार निधीतून तहसिल कार्यालय – पोलीस स्टेशन जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सुशोभीकरण लोकार्पण किंमत – १६ लक्ष