चाळीसगाव, प्रतिनिधी । बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स अॅड के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव येथे महिला तक्रार निवारण समितीमार्फत कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण या विषयावर एकदिवसीय वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मिलिंद बिल्दीकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्त्या म्हणून अॅड सौ . माधुरी एेडके या होत्या . प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साै. शुभांगी एस. पूर्णपात्रे (संचालिका चा.ए.सो.) उपप्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे (आयक्यूएसी समन्वयक) उपस्थित होते .
प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा. कु. एल. व्ही. उपाध्ये (मानसशास्त्र विभागप्रमुख ) यांनी प्रास्ताविक मांडताना सांगितले जर कामाच्या ठिकाणी मुलींची महिलांची छेडछाड होत असेल, अपमान होत असेल तर त्याविरूध्द निषेध नोंदवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमच्या संरक्षण दुर्बलतेची जाहिरात न करता आत्मविश्वासाने आलेल्या प्रसंगाला विरोध करा असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ. बिल्दीकर यांनी असे म्हटले की महिलांनी सक्षमच नाही तर त्यांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे.
महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीकडे अजून एकही गंभीर स्वरुपाची तक्रार आलेली नाही. याचा अर्थ असा नाही की अशाप्रकारचे गैरप्रकार होत नाहीत जर असे गैरप्रकार मुलींबरोबर झाले तर त्यांनी अवश्य समितीकडे तक्रार नोंदवावी किंवा महाविद्यालयातील तक्रार पेटीमध्ये लेखी स्वरुपात टाकावी असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच प्रमुख वक्त्या अॅड. माधुरीताई एडके यांनी मनोगतात असे सांगितले की ; कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे . पोलिस स्टेशनला लेखी स्वरुपात पुराव्यासहित तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. तसेच पालकांनाही याबद्दल स्पष्ट बोलणे गरजेचे आहे . यासाठी त्यांनी मुलींना विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी विशाखा समिती आणि कालच पास झालेल्या शक्ती विधेयकाबद्दलही सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विषयाच्या प्रा. सौ. एस. एस . जगताप यांनी केले . उपस्थितांचे आभार ग्रंथपाल कु. ए. ए. वनिकर यांनी मांडले . हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. नयना पाटील डॉ . राहुल कुलकर्णी डॉ . दीपाली बन्सवाल श्री. मनोहर निकम श्री. भूषण जोशी यांनी सहकार्य केले . यावेळी प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
