चाळीसगाव ,
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चे बी. पी. आर्टस , एस. एम. ए. सायन्स अेॅड के. के. सी. काॅमर्स काॅलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर काॅलेज, चाळीसगाव येथे मराठी विभागाच्यावतीने दि.१९/१/२०२२ रोजी. सायं.५:००वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अेॅानलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
कविसंमेलनाचे उद्घाटन मा.नारायणभाऊ अग्रवाल
( चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या, मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन.) यांच्या हस्ते करण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मराठीतल सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार या होत्या. या कविसंमेलनात प्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मा.मीनाक्षी पाटील, मुंबई. प्रसिद्ध कवी , चित्रपट गीतकार डॉ.दासू वैद्य (अैारंगाबाद) प्रसिद्ध कवी, प्रा. डॉ.पी. विठ्ठल ( नांदेड) ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे गीतकार व सुप्रसिद्ध कवी डॉ. विनायक पवार ( पेण) सुप्रसिद्ध कवी, गजलकार मा. नितीन देशमुख ( अमरावती) हे निमंत्रित होते.
या अतिशय रंगलेल्या कविसंमेलनात नितीन देशमुख यांनी सादर केलेल्या गजलांनी चांगलीच वाहवा मिळवली. _*पापण्यातून जेवढी बरसात होते*_
_*मोकळी दु खास जागा आत होते* असा शेर सादर करत _*जळणाऱ्याला विस्तव कळते बघणार्याला नाही, जगणार्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही*_
_*उगाच घेते नाव सखे तू माझे का प्रेमाने, डाळिंबाच्या ओठांवरती कडुनिंबाचे गाणे*_ या गझलांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
विनायक पवार यांनी आजोबा आणि नातू यांच्यातला संवाद आपल्या कवितेतून मांडला. श्रोत्यांच्या फरमाईशी खातर त्यांनी _*तुझ्या रूपाचं चांदणं पडल्यानं मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजवू द्या*_ हे गीतही सादर केले . कवी दासू वैद्य यांनी आपल्या कवितेतून कवी आणि कवितेच नातं सांगताना ‘खूप दिवस झाले मी लिहिली नाही कविता’ ही कविता सादर केलीज्यातून कवी आणि कवितेचा संवाद उजागर झाला आहे . याशिवाय त्यांनी कोरोना काळातील अनुभवांवरील कवितेतून कोरोना काळातील माणुसकीचा सूर आळवला. कवी पी. विठ्ठल यांनी _*नदी कुठून तरी येते, दूर कुठेतरी समुद्रापर्यंत जाते, शतकानुशतकांचा प्रदीर्घ इतिहास घेऊन वाहत राहते नदी, नदी ही बघण्याची नव्हे अनुभवण्याची गोष्ट असते, आणि पाणी झाल्याशिवाय नदीशी एकरूप होता येत नाही*_ ही कविता सादर केली. मीनाक्षी पाटील यांनी आपल्या कवितेतून _*मी जिवंत आहे असं मला अधूनमधून वाटतं, मग वाटण्याचं काय करायचं ते मात्र मला कळत नाही, खरं सांगायचं तर मी जिवंत आहे म्हणजे काय आहे, हे समजावून घेण्यासाठी मी कविता लिहिते*_ आणि त्यांच्या बालपणातील अनुभवांतील भिंगरी ह्या सादर केल्या.
कविसंमेलनाचे अध्यक्षीय समारोप करताना प्रज्ञा दया पवार यांनी कोरोना काळातील स्थिती गतीवर प्रकाश टाकला. कवीचे कर्तव्य आणि कवितेची भूमिका विषद केली. त्यांच्या कवितेतून मानवी कळवळ्याची भावना प्रकट झाली. या प्रसंगी मा.आबासो प्राचार्य बाळासाहेब चव्हाण (अध्यक्ष ) मा.दादासो मिलींद देशमुख (उपाध्यक्ष ) मा. डॉ. विनोदजी कोतकर (सचिव) मा.बापुसो डॉ.एम.बी.पाटील
(चेअरमन, सिनि.काॅ. कमेटी) मा.नानासो श्यामलाल कुमावत
(चेअरमन, ज्युनि.काॅ.कमेटी) व सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि संचालक मंडळ , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी , चाळीसगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,
प्रा. ए. टी. लोंढे (मराठी विभाग प्रमुख)यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कविसंमेलनाचे सूत्रसंचलन डॉ वीरा राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डाॅ. ए. व्ही. काटे यांनी केले यांनी सर्वांचे आभार मानले . या कविसंमेलनाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला .
