चाळीसगाव, प्रतिनिधी । पोहरे तालुका चाळीसगाव येथील विकास खैरनार यांनी जुगाड पद्धतीने ट्रॅक्टर व फळबाग साठी पावडर फवारणी व वखरटी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतीशय कमी इंधनावर चालणारे यंत्र तयार केले आहे ते ट्रॅक्टर व फळबाग पावडर फवारणी व वखरटी करणारे यंत्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा ना दादाजी भुसे साहेब यांनी पाहील्या नंतर विकास खैरनार बापुसो चंद्रकांत सोनवणे यांना शासनामार्फत कोणतीही मदत लागल्यास मला सांगा ती मी करणार असे आश्वासन दिले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची देखील लागवड करण्यात आली.
या वेळी उद्घाटन नानासो भिमराव हरी खलाणे विधानसभा क्षेत्र प्रमूख चाळीसगाव तसेच युवा सेना अधीकारी चाळीसगाव युवा सेना तालुका प्रमुख चाळीसगाव दादासो सागर रमेश पाटील व युवासेना उपतालुका प्रमुख मेहुणबारे गट सुरेश भाऊ पाटील युवासेना उपतालुका प्रमुख बहाड करमुड गट नितीन दादा माळी यावेळी गावातील उपस्थित शिवसैनिक व शेतकरी बांधव चंद्रकांत महाजन रमेश बिरारी धर्मराज माळी देविदास बिरारी अजय जाधव सुनील बागुल भूषण सोनवणे भावडू महाजन किशोर मोरे मनोज सोनवणे कुणाल केदार राजेंद्र मिस्तरी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते